अखिल भारतीय मराठा महासंघ​

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवुन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी/ त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.

  1. पात्रता- राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहीतीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य(आई-वडिल, शेतकर्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे एकुण 2 जणांकरिता ही योजना आहे.
  2. वयोमर्यादा-10 ते 75 वर्षे.
  3. नुकसान भरपाई रक्कम– अ.-अपघाती मृत्यू- रु.2 लाख, ब.- अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे- रु.2 लाख क.-  अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु. 2 लाख, ड.- अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.1 लाख.

अधिक महितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा किंवा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

https://drive.google.com/file/d/1fV_zWUvEAd72nYcYIPSBd7HNWReCM6dI/view