अखिल भारतीय मराठा महासंघ​

अखिल भारतीय मराठा महासंघ ही सामाजीक संघटना १९८१ साली कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केली आहे . मराठा समाजाची शैक्षणिक , सामाजिक ,सांस्कृतिक ,आर्थिक , उन्नती व्हावी .त्याचबरोबर सामाजिक दबावगट निर्माण व्हावा ही मुलभूत संकल्पना मराठा महासंघाची आहे. सद्य स्थितीत मराठा समाजाची तुलनात्मात दृष्ट्या वेगाने पिछेहाट होत आहे .समाज स्थितीवादी होत असून या समाजात विज्ञानामुख विचारसरणीचा प्रसार पुरोगामी दृष्टीकोन रुजविला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजात स्वाभिमान, स्वावलंबन ,जागृती या तीनही गोष्टींचा आधार घेत समाजाने प्रगतीपथावर घोडदौड केली पाहिजे. एकेकाळी सामर्थ्याच्या जोरावर दुर्मालांचे रक्षण करणारा मराठा समाज आज विद्यमान सामाजिक , राजकीय ,आर्थिक व्यवस्थेमध्ये कोंडीत सापडला आहे .