अखिल भारतीय मराठा महासंघ​

महासंघाची माहिती

स्थापना इ.स.१९००
रजि क्र.६६९ (मुंबई)

जय भवानी,
अखिल भारतीय मराठा महासंघ ही सामाजीक संघटना १९८१ साली कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केली आहे . मराठा समाजाची शैक्षणिक , सामाजिक ,सांस्कृतिक ,आर्थिक , उन्नती व्हावी .त्याचबरोबर सामाजिक दबावगट निर्माण व्हावा ही मुलभूत संकल्पना मराठा महासंघाची आहे. सद्य स्थितीत मराठा समाजाची तुलनात्मात दृष्ट्या वेगाने पिछेहाट होत आहे .समाज स्थितीवादी होत असून या समाजात विज्ञानामुख विचारसरणीचा प्रसार पुरोगामी दृष्टीकोन रुजविला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजात स्वाभिमान, स्वावलंबन ,जागृती या तीनही गोष्टींचा आधार घेत समाजाने प्रगतीपथावर घोडदौड केली पाहिजे. एकेकाळी सामर्थ्याच्या जोरावर दुर्मालांचे रक्षण करणारा मराठा समाज आज विद्यमान सामाजिक , राजकीय ,आर्थिक व्यवस्थेमध्ये कोंडीत सापडला आहे . त्यामुळे समाजास परिवर्तनवादी दिशा दाखवण्यासाठी चळवळीची गरज आहे .त्यासाठी समस्थ मराठा समाजाने संघटीत होऊन जुना परंपरागत वारसा जपत डोळसपणे पुढील पावले टाकणे गरजेचे आहे . त्या दृष्टीकोनातून मराठा महासंघ सतत समाजाचे प्रबोधन करीत असून या शिवकार्यात समाजाचे तन मन धनासह योगदान असणे गरजेचे आहे . मराठा महासंघ हा कुठल्या जातीधर्माच्या विरोधात नसून समाजातील दोष कमी करून सर्वसामान्य कष्टकरी ,शेतकरी ,कामगार इ. वर्गाच्या प्रश्नांची दखल घेत आपली वाटचाल करीत आहे. तसेच विविध रचनात्मक उपक्रम व चळवळीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील मराठा समाज संघटीत करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्वांनी सक्रीय सहकार्य करणे आवश्यक आहे.

एकविसाव्या शतकाकडे झेपावणाऱ्या विज्ञानयुगात आपले स्थान कोठे आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. समाज स्थितिवादी होत असून वेगवान स्पर्धेच्या युगात इच्छा असो वा नसो काळाच्या प्रवाहात टिकायचे असेल तर नव्या रणांगणावर आपण उतरले पाहिजे. पुरोगामीपणाची झूल पांघरून जातीव्यवस्थेच्या अंताची भाषा करणारे आपल्या जातीच्या भिंती भक्कम करणाऱ्यांच्या मागे लागले आहेंत. सर्वच समाज एकसंघ , एकरूप व्हावेंत असे बऱ्यांच जणांना वाटते. मात्र त्याचे नेमके उत्तर त्यांच्याकडे स्वातंत्र्याच्या ६२ वर्षानंतर आजही नाही . अशांना मराठा महासंघावर बोलण्याचा अधिकार नाही. तरीही आम्ही वचन बद्ध आहोत. कै. अण्णासाहेब पाटील यांच्या त्या वचनाला ..” या देशात करी जातधर्मनिरपेक्षता रुजवायची असेल तर सर्व जाती धर्माच्या संघटनांवर बंदी आणावी . मराठा महासंघ पहिला आपला गाशा गुंडालेल.” महासंघ कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून ” जगा आणि जगू द्या ” या भावनेने प्रेरित आहे. मात्र आमच्यावर चालून येणाऱ्यांना ” मारू किवा मरू “ या उक्तीने वागवण्यास मोकळे आहोत . मुजोर वाढत चाललेल्या प्रवृक्तीला पायबंध घालण्यासाठी सामाजिक दबावाचे हत्यार आपण सदेव तयार ठेवले पाहिजे .

लहान मोठा सगळाच मराठा एकवटण्यासाठी,त्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी ” मराठा जोडो ” मोहिमेच्या निमिताने निमिताने घ्या हाती शिवबाचा भगवा साद आहे मावळ्यांना अखिल भारतीय मराठा महासंघाची , जागे व्हा नाही तर झेपावेल काळ तुमचा घास घेण्यास , नसेल त्या वेळेस बरोबर कोणी, म्हणून वेळ गेली नाही , जागे व्हा .. जागे व्हा …अन सामील व्हा अखिल भारतीय मराठा महासंघात ..जय भवानी जय शिवाजी !

 

उपक्रम

  • गुणवंत मान्यवरांचा सत्कार
  • शालेय साहित्य वाटप
  • वधूवर सूचक केंद्र वधूवर परिचय मेळावे
  • नागरी सहकारी पतसंस्था
  • स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र
  • महिला औद्योगिक सह .संस्था
  • सामुदायिक विवाह सोहळा
  • गरजू विद्यार्थ्यांना शिष्यावृत्ती
  • उद्योग विकास सह .संस्था
  • कृषीविषयक शिबीर
  • रिक्षाचालक मालक संस्था
  • व्यवसाय मार्गदर्शन केंद्र
  • कॅरीर मार्गदर्शन केंद्र
  • गडकोट स्वछाथा
  • शेतीसल्ला मार्गदर्शन शिबिरे
  • मोफत वैद्यकीय ,वकिली सल्ला शिबिरे
  • रक्तदान आरोग्य चिकित्सा
  • १० वी १२ वी विदयार्थी मार्गदर्शन मेळावे
  • अनेकविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम
  • विविध प्रश्नांवर आंदोलने ,परिषदा ,मेळावे ,असे बरेच काही…