अखिल भारतीय मराठा महासंघ​

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची १९०७ ते १९३९ अधिवेशने

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची देशामध्‍ये १९०७ सालापासून ते १९६९ पर्यंत अनेक अधिवेशने झाली या अधिवेशनाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव महाराज गायकवाड, त्‍याचबरोबर श्रीमंत खासे साहेब महाराज पवार देवास, यशवंतराव घोरपडे सोंडूर, खासेराव जाधव बडोदे, छत्रपती राजाराम महाराज कोल्‍हापुर, माधवमहाराज शिंदे ग्‍वालेर, बाबुराव गणपतराव जगताप पुणे, डॉ. पी. सी. पाटील कोल्‍हापुर, बाबुराव मारोतीराव जेधे पुणे, बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्‍हाण अशी दिग्‍ज मंडळी या परिषदेशी संलग्‍न होती. देशामध्‍ये मराठा व बहुजन समाजात शैक्षणिक जागृती व्‍हावी. सामाजिक सुधारणा व्‍हाव्‍यात. शिक्षणसंस्‍थांची निर्मिती व्‍हावी या भुमिकेतून या अधिवेशनांमधून चर्चा होऊन अनेक शिक्षण संस्‍थांची निर्मिती त्‍या काळामध्‍ये झाली. आज मराठा व बहुजन समाजातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्‍यवरांनी हे पुस्‍तक वाचले पाहिजे. त्‍या काळामध्‍ये समाजधुरीनांनी केलेल्‍या कामाची पुण्‍याई आज समाजाला एका टप्‍प्‍यावर आणून ठेवण्‍यासाठी उपयुक्‍त झालेली आहे.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद अधिवेशने यासाठी या ठिकाणी लिंकवर क्लिक करून पुस्तक वाचा