अखिल भारतीय मराठा महासंघ​

अण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने सन १९९८ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेकडून कै.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची मागणी महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष कै किसनराव वरखिंडे यांच्या शिष्टमंडळाने मान्य करून घेतली व ते या महामंडळाचे प्रथम अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.

महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपध्दती ही ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे. सदर योजना ही लाभार्थीभिमुख असून लाभार्थी जोपर्यंत सर्व माहिती वेब प्रणालीवर (www.udyog.mahaswayam.gov.in)  अपलोड करीत नाही, तोपर्यंत पुढील कार्यवाही करता येत नाही.

अधिक माहितीसाठी महामंडळाच्‍या  वेबसाईटची खालील लिंक वर जाऊन अधिक माहिती घ्‍यावी.

www.udyog.mahaswayam.gov.in