अखिल भारतीय मराठा महासंघ​

पुढच पाऊल

आज ज्ञानाचा विस्फोट झालेला दिसून येत आहे. प्रत्येक ज्ञानशाखेत नवनवीन माहितीची भर पडत आहे. हे युग विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे आणि स्पर्धेचे आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ज्ञानाची नवी दालने खुली होत आहेत. या परिवर्तनाबरोबर आपण पुढे गेलो, तरच आपला टिकाव लागणार आहे. आजच्या युगात आपले स्थान कोठे आहे, याचा आपण विचार केला पाहिजे.

त्यासाठी समाजाने स्थितिवादी होण्यापेक्षा गतिवादी झाले पाहिजे. कोणत्याही जातीधर्माचा द्वेष न करता, अंतर्मुख होऊन आपण चिंतन केले पाहिजे. त्यासाठी समाजाने काळानुरूप बदल स्वीकारले पाहिजेत, यासाठी एक संक्षिप्त पुस्तिका अनेकांच्या सूचनांचा विचार करून कमी वेळात साकार केली आहे.

‌‘आजचा निश्चय पुढचं पाऊल‘ या संकल्पनेतून यापुढे ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास घेऊन समाजाने आपल्या विकासासाठी शिक्षण, उद्योग, व्यवसाय, अर्थ ,सहकार ,कृषी ,विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रांत दमदारपणे पाऊल टाकले पाहिजे. धन्यवाद
राजेंद्र कोंढरे
अध्यक्ष
अखिल भारतीय मराठा महासंघ

#kondharespeak
#pudhachpaul
#marathareservation