७/१२ वर कोणतेही हक्क नोंदविण्यापूर्वी फेरफारांची नोंद हक्क पत्रकी घेतली जाते. मात्र असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारी यापूर्वी असलेल्या फेरफार नोंदीबद्दल असतात. पूर्वी झालेल्या चुकांच्या नोंदीमध्ये कशी दुरुस्ती करावी हे अनेकांना समजत नाही.
चुकीच्या नोंदीचे स्वरूप
जमीन व्यवहार करीत लोक गुंतागुंतीचे व्यवहार करीत असल्यामुळे अनेक प्रकारे हक्कांच्या संदर्भात अडथळा निर्माण होऊ शकतो व त्यामुळे न्याय असे हक्क प्राप्त होत नाहीत. त्यालाच लोक रेकॉर्डमध्ये चूक झाली असे म्हणतात.