डॉ. गिरीश जाखोटिया हे मराठीतील नामांकित लेखक आहेत. डॉ. जाखोटिया हे आंतरराष्ट्रीय व्यव्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. टाटा समूह, महिंद्रा समूह, गोदरेज, सिमेंस, एल & टी, ब्रिटिश पेट्रोलियम, ओमानची सेंट्रल बॅंक, बजाज ऑटो इ. साठहून अधिक नामांकित कंपन्यांसाठी त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे. वित्त व व्यूहात्मक व्यवस्थापनावरील त्यांचे इंग्रजीतील ग्रंथ उद्योजकीय क्षेत्रात प्रसिध्द आहेत. त्यांच्या नावावर काही महत्वाचे कॉपीराइट्स आहेत. असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स, दिल्लीतर्फे अखिल भारतीय सर्वोत्तम प्राध्यापक पुरस्कार व बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे त्यांना उद्योजकीय विषयातील सर्वोत्तम प्राध्यापक पुरस्कार मिळालेला आहे. सध्या ते आणि त्यांची पत्नी मंजिरी जाखोटिया & असोसिएट्स ही सल्लागार फर्म विलेपार्ले, मुंबई येथून चालवितात.