प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)
- सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि नवे सूक्ष्म अत्रप्रक्रिया उद्योग सुरु करणे.यासाठी हि योजना सुरु केली आहे त्याचा जास्तीतजास्त फायदा नवउद्योजकांनी घेतला पाहिजे.
- सर्व प्रकारच्या नवीन व कार्यरत सूक्ष्म अत्र प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत लाभ (Credit Linked Bank Subsidy)
- आजारी सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगही बँक कर्ज उपलब्ध होत असल्यास पात्र
- पारंपारीक / स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन (Vocal For Local व Local To Global)
- वैयक्तिक लाभार्थी प्रगतशील शेतकरी, नव उद्योजक, बेरोजगार युवक, महिला वैयक्तिक मालकी/ भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), स्वयंसहायता गट (SHG), गैर सरकारी संस्था (NGO), सहकारी संस्था (Cooperative), खाजगी कंपनी ( Ltd. Companies) इत्यादी.
- गट लाभार्थी / CIF शेतकरी उत्पादक संस्था (FPO) / शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) सहकारी संस्था (Cooperative), स्वयंसहायता गट (SHG) आणि त्यांचे फेडरेशन (उदा. MSRLM-CLF MAVIM-VLF, CMRC / NULM-ALF) शासकीय संस्था
- एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) किंवा NON-ODOP साठीचे प्रस्ताव सहाय्यासाठी पात्र तथापि ODOP प्रस्तावांना प्राधान्य
- योजनेमध्ये नाशवंत फळपिके, कोरडवाहू पिके, भाजीपाला, अनधान्ये, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मसाला पिके, गुळ इत्यादींवर आधारित उत्पादने, दुग्ध व पशु उत्पादने, सागरी उत्पादने, मांस उत्पादने, वन उत्पादने इत्यादी उत्पादनांचा समावेश
- योजनेची सर्व प्रक्रिया संगणकांसोबत मोबाईल वरून देखील अर्ज सादर करता येईल. एकाच लाभार्थ्याला योजनेंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल.
योजनेंतर्गत घटक, लाभार्थी आणि आर्थिक मापदंड
- प्रशिक्षण
योजने अंतर्गत जिल्हास्तरीय समितीने कर्जमंजूरीसाठी बँकेकडे शिफारस केलेले वैयक्तिक लाभार्थी (३ दिवस प्रशिक्षण), योजनेअंतर्गत बीज भांडवल लाभ मिळालेले स्वयं सहाय्यता गटांचे लाभार्थी (१ दिवस प्रशिक्षण) अनुदान १००%
२. बीज भांडवल
ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहाय्यता गटातील सदस्य, गट, त्यांचे फेडरेशन यांना लहान मशिनरी ( Small Tools ) खरेदी करण्यासाठी व खेळते भांडवल (Working Capital) यासाठी प्रति सदस्य कमाल रकम रु.४०,०००/- व प्रति स्वयंसहाय्यता गट कमाल रक्कम रु. ४,00,000/-
३ . वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग
वैयक्तीक मालकी/ भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), स्वयं सहायता गट (SHG). अशासकीय संस्था (NGO), सहकारी संस्था (Cooperative), खाजगी कंपनी (Pvt. Ltd. Companies ) यांना पात्र प्रकल्प किमतीच्या ३५% जास्तीत जास्त 10 लाख.
४. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग गट लाभार्थी
स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, तसेच अशासकीय संस्था (NGO) यांना पात्र प्रकल्प किंमतीच्या 35% जास्तीत जास्त 10 लाख
५. सामाईक पायाभूत सुविधा / इन्क्युबेशन केंद्र / मूल्यसाखळी :
शेतकरी उत्पादक संस्था (FPO) / शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) सहकारी संस्था (Cooperative), स्वयंसहायता गट (SHG) आणि त्यांचे फेडरेशन (उदा. MSRLM-CLF, MAVIM-VLE, CMRC /NULM-ALF) शासकीय संस्था यांना पात्र प्रकल्प किमतीच्या ३५ % जास्तीत जास्त ३.०० कोटी
६. मार्केटींग व ब्रॅन्डींग
शेतकरी उत्पादक संस्था (FPO) / शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) उत्पादक सहकारी, स्वयंसहायता गट (SHG) यांचे समूह अथवा SPV यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या ५०% कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल.
संकेतस्थळ : https://pmfme.mofpi.gov.in/
अधिक महितीसाठी वरील लिंकवर जा किंवा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.