मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART)
- कृषि मूल्य साखळयांच्या सुगी पश्चात क्षेत्रांमध्ये मूल्यवर्धना साठी प्रोत्साहन देणे
- छोट्या शेतकऱ्यांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक व्यवसाय आराखडया द्वारे कृषि व्यवसाय क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे.
- कृषि व्यवसाय क्षेत्रात लघु व मध्यम उद्योगांच्या स्थापनेसाठी उत्तेजन देणे.
- हवामान बदलाच्या अनुषंगाने कृषि क्षेत्रातील उत्पादन व व्यावसायिक जोखमींचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी हवामानाधारित कृषि उत्पादन व्यवस्थांच्या उभारणीस सहाय्य करणे.
- कृषि व्यवसायांच्या उभारणीस बळकटी देणे, त्यांना अधिक बाजारपेठा उपलब्ध करुन देणे तसेच कृषि व्यवसायांची हवामान लवचिकता व संसाधन वापराची कार्यक्षमता वाढविणे हे या प्रकल्पाचे ध्येय आहे.
घटक :
- उत्पादक भागीदारी उपप्रकल्प ( Productive Partnership) 2) बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प ( Market Access Plan ) 3) गोदाम आधारित प्रकल्प ( Warehouse Based Subprojects ) 4) नावीन्यपूर्ण उपप्रकल्प ( Complementary Innovation Investment -CII )कापूस मूल्यसाखळी
पात्र लाभार्थी :
शेतकरी उत्पादक कंपनी, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महिला बचत गटांचे प्रभाग संघ, लोक संचलित साधन केंद्र (CMRC), प्राथमिक कृषी पतसंस्था, उत्पादक संघ, VSTF गाव समूह ईत्यादी.
अनुदान: प्रति समुदाय आधारित संस्था मंजूर उपप्रकल्प मूल्याच्या जास्तीत जास्त ६०% रक्कम व्यवहार्यता अंतर निधी ( Viability Gap Fund). फलोत्पादन आधारित प्रकल्प – रु. ३.०० कोटीच्या मर्यादेत, अन्य पिके आधारित प्रकल्प- रु. २.०० कोटीच्या मर्यादेत व पूरक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आधारित प्रकल्प – रु. ०.५० कोटीच्या मर्यादेत.
संकेतस्थळ : https://smart-mh.org
अधिक महितीसाठी वरील लिंकवर जा किंवा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा..