मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील तरुण/तरुणी स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करू शकतील व ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करतील त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण/तरुणींना नोकरीसाठी शहरी भागात जाण्याची गरज भासणार नाही. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणारे व्यवसाय
उत्पादन क्षेत्रातील उदयोग सेवा उदयोग कृषीपूरक व्यवसाय कृषीवर आधारित उदयोग ई वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय संघटित साखळी विक्री केंद्रे फिरती विक्री केंद्रे खाद्ययात्रा केंद्रे
योजनेची माहिती- यामध्ये अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रकल्प खर्चाच्या 30 टक्के, कमाल रु.50 लाख इतके अनुदान दिले जाते. अनुदान खालील बाबींसाठी मिळते-
अनुदान कृषी व अन्नप्रक्रिया नवीन उद्योग स्थापन करणे तसेच कार्यरत असलेल्या /इतर योजनेतून लाभ घेतलेल्या कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांचे स्तरवृद्धी, विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी दिले जाते.
मुल्यवर्धन, शीतसाखळी आणी साठवणूकीच्या पायाभूत सुविधा उदा. काढणीपश्चात पुर्वप्रक्रिया केंद्र व एकात्मिक शीतसाखळी स्थापित करणे यासाठी सुद्धा अर्थसहाय्य दिले जाते.
सन 2022-23 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणुन साजरे करण्यात येत असल्यामूळे पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया प्रकल्पांना प्राधान्य आहे.
पात्र लाभार्थी –
वैयक्तीक लाभार्थी: वैयक्तीक उद्योजक,सक्षम शेतकरी, बेरोजगार युवक,महिला, नवउद्योजक, अग्रीगेटर, भागीदारी प्रकल्प(partnership), भागीदारी संस्था(LLP) ई.
गट लाभार्थी- शासकीय / खाजगी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी/गट/संस्था, स्वयं सहायता गट, उत्पादक सहकारी संस्था
संकेतस्थळ : www.krishi.maharashtra.gov.in
अधिक महितीसाठी वरील लिंकवर क्लिक करा किंवा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.