इतिहास हा राष्ट्राचा आणि समाजाचा प्रबोधक असतो. इतिहासातून आपण प्रेरणा घ्यायची असते, त्या प्रेरणेतून राष्ट्राची निर्मिती- राष्ट्राची उभारणीसाठी प्रयत्न करायचे असतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. औरंगजेबाशी सलग अर्धशतकाचे स्वातंत्र्य युद्ध खेळून जिंकलेल्या मराठ्यांचे राज्य त्यांच्या कारभाराने आटोपले. तलवारीच्या पात्यांनी निर्माण केलेले चार पिढ्यांच्या शौर्यशाली बलिदानाने मिळवलेले स्वराज्य आणि स्वातंत्र्य लेखणीच्या एका फटक्यात पेशवाईत रूपांतरित झाले आणि नंतर साता समुद्रा पार होऊन आलेल्या गोऱ्या टोपीकर फिरंगी व्यापाऱ्यांच्या गुलामगिरीत 150 वर्ष पिचत पडलो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ही अनेक स्वातंत्र्ययोध्य्यानी त्याग केला आहे. इतका पराक्रमाचा इतिहास असूनही आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास म्हणावा तसा जपला जात नाही इतिहास जपायचे म्हणजे काय करायचे याची जाणीव आपल्या मनात कमी आहे.