अखिल भारतीय मराठा महासंघ​

बँक ऑफ बरोडाचे संस्थापक महाराजा सयाजीराव गायकवाड

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी १९०८ मध्ये स्थापन केलेल्या बँक ऑफ बडोदाच्या स्थापनेचा इतिहास विचारात घेतला तर या पूर्वतयारीची आपल्याला कल्पना येईल. राज्यातील शेती आणि उद्योग यांना बळकटी देणे हा बँक ऑफ बडोदाच्या स्थापनेमागील महाराजांचा मुख्य उद्देश होता.

सुधारणांचा आपण ज्यावेळी विचार करतो तेव्हा महाराजांनी बँक ऑफ बडोदाच्या स्थापनेसाठी निवडलेली वेळ किती अचूक होती हे स्पष्ट होते. बँक ऑफ बडोदा आणि शेती-उद्योगाच्या विकासासाठी अमेरिकन अर्थतज्ज्ञ भारतात आणणारे सयाजीराव हे पहिले राज्यकर्ते होते. यातच बडोद्याच्या शेती आणि उद्योग क्षेत्रातील क्रांतिकारक विकासाची बीजे आपल्याला सापडतात. ११३ वर्षांपूर्वी महाराजांनी स्थापन केलेली ही बँक भारतातील सर्वोत्तम बँकांच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकात आहे. जगातील १९ देशांमध्ये ९६ शाखांसह ती उत्तम स्थितीत कार्यरत असल्याचे दिसते. यामागे महाराजांनी केलेली भक्कम पायाभरणीच कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे जाणवते.

संपूर्ण पुस्तिका वाचण्यासाठी साकेत प्रकाशन ने प्रकाशित केलेली ही पुस्तिका खालील लिंकवर उपलब्ध आहे .

महाराजा-सयाजीराव-आणि-बँक-ऑफ-बडोदा-2-1